Breaking News

दारूमुक्त मातृतीर्थ जिल्ह्यासाठी चिखली येथे पेटली मशाल

अ‍ॅड.वृषाली बोंद्रे व मृणाली सपकाळ यांच्या नेतृत्वात मशाल मार्च

बुलडाणा, दि. 06, ऑक्टोबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत  झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा  जिल्ह्याला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल  प्रज्वलित केली असून, जिजामातेच्या पावन स्पर्शाने पुनित या  जिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा विश्‍वास  दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने आयोजित मशाल मोर्चात  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.  वृषाली बोंद्रे यांनी व्यक्त केला. 
दारूमुक्त निर्धार परिषदेच्यावतीने चिखली येथे छत्रपती  शिवरायाच्या पुतळयाला वंदन करून तर बुलडाणा येथे महत्मा  गांधी यांच्या पुतळयाला वंदन करून 2 ऑक्टोबर रोजी  सायंकाळी जिल्हाभर सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्था,  संघटना आणि दारूबंदीसाठी झटणार्‍या महिलांचा मशाल मार्च  काढण्यात आला.
चिखली येथे अ‍ॅड. वृषाली बोंद्रे व मृणाली सपकाळ यांच्या नेतृत्वात हा मशाल मार्च काढण्यात आला होता. प्रमुख रस्त्याने  घोषणा देत ही दारूमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत पोहचविण्याचा  प्रयत्न सहभागी असलेल्या महिला व पुरुषांनी केले. या मोर्चात  महत्मा गांधी की जय, मातृतीर्थ जिल्हा दारूमुक्त झालाच पाहिजे  सारखे नारे देण्यात आले. चिखली येथील मशाल  मोर्चात जि.प. सदस्य ज्योती पडघान, भारती बोंद्रे, शोभा सवड तकर, ज्योती बियाणी, शिल्पा लढ्ढा, संगीता गाडेकर, शालिनी  थोरात, सुनीता शिंगणे, उषा डुकरे, करुणा बोंद्रे, विद्या देशमाने,  वनिता साखळकर, शोभा चव्हाण, सीमा चित्ते, शोभा सपकाळ,  गीता भोजवानी, वंदना पोपट, कीर्ती सिसोदिया, वंदना इंगळे,  कौसर खान, चवरे, मनीषा भुते, जयश्री देशमाने, पळसकर, छानू  श्रीवास्तव, निहा खरात, अनिता घुगे, संगीता गायकी, शालिनी  वानखेडे, प्रमिला जाधव, हिरकणी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्या,  विविध संस्था, संघटनेचे पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील अनेक  गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.