0
जळगाव, दि, 12, ऑक्टोबर - चाळीसगाव तालुक्यात नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालें असून लोंजे येथील नवनिर्वाचित  सरपंच व सदस्यांचा सत्कार आ. उन्मेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, पं.स.सदस्य सुनील पाटील, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, जितेंद्र  वाघ, रोकडेचे उपसरपंच सुनील पवार, लोंजे येथील प्रदीपदादा राठोड, श्रावण जाधव, अ‍ॅड. भरत चव्हाण, हरसिंग राठोड, साहेबराव पाटील, राजू माळी, झुगराज सोनार, रामेश्‍वर चव्हाण,  राजेंद्र जाधव, दादा मल्लू चव्हाण, सुदाम पवार आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच सौ.जिजाबाई ताराचंद चव्हाण यांचे पती ताराचंद शंकर जाधव, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बळीराम उत्तम चव्हाण, तुकाराम तुळशीराम चव्हाण, संत्रीबाई  ताराचंद चव्हाण, गंगाधर मलखान चव्हाण, आशाबाई ऑन भिल्ल, विक्रम जयसिंग राठोड, मीराबाई सागरमल सोनार, अनिता शालिग्राम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. आमदार  उन्मेश पाटील यांनी गावाच्या विकासासाठी हवे ते सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन आपल्या मनोगतातून दिले.

Post a Comment

 
Top