Breaking News

लेखी आश्‍वासन देऊनही कामे नाहीत

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - शहरातील वाढती दुर्गंधी, रस्त्यात जागोजागी पडलेले खड्डे, अपूर्ण कामामुळे नागरिकांना होत असलेला त्रास, तसेच वीज, पाणी यासह विविध  समस्या सोडविण्याचे लेखी आश्‍वासन नगरपरिषदेने देऊनही  त्याकडे दुर्लक्ष केले याच्या निषेधार्थ जनसेवा युवा संघटनाच्या वतीने रस्ता रोको करून नगरपरिषदेच्या कारभाराचे  वाभाडे काढले.
शहरातील खर्डा चौकात जनसेवा युवा संघटनेने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पवनराजे  राळेभात म्हणाले, विकासकामासाठी   सत्ताबदल होऊन दोन महिने झाले  अद्याप एकही काम मार्गी लागले नाही. संपूर्ण शहर चिखलमय झाले असून जागोजाग रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खर्डा चौक ते अमरधाम पर्यंतचा तपनेश्‍वर येथील रस्ता विरोधात  असताना अनेक कारणांनी बंद पाडणारे आता सत्तेत आले पण या रस्त्याकडे डुंकून बघत नाही. नालीचे काम अर्धवट ठेवल्याने गटारीचे पाणी तुंबले ते तेथील रहीवास्यांच्या घरात  जात आहे. घरात जायला रस्ता नाही. नागरीकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनचा इशारा दिला. 
बाबा चंदन म्हणाले, शहर हे चार जिल्हाच्या हहदीत असलेले  गाव आहे परंतु या शहराची बकाल अवस्था झाली आहे असा आरोप केला. पालक मंत्र्यानी विकास कामात लक्ष  घालुन जामखेडला पुर्ण वेळ अधिकारी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत विकास होणार नाही त्यामुळे आंदोलन करत राहू. सामाजिक कार्यकर्ते  विकी सदाफुले यांनी नगरपरिषदचा धिक्कार  केला व कारभार नीट चालवावा अशा इशारा दिला.
युवक नेते अमोल गिरमे यांनी शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित करावा , पाईपालाइन दुरुस्ती  यावर मत मांडले. आण्णा ढवळे, नितीन हुलगुंडे  यांनी जामखेड शहर भकास होण्यास  प्रशासन व  सत्ताधारी जबाबदार आहेत. गल्ली पासुन दिल्ली पर्यंत भाजपा सत्तेत असुन विकास काम का होत नाही असा सवाल उपस्थित केला. विकास राळेभात, माजी जि.  प.  सदस्य शहाजी राळेभात यांनी प्रशासन व नगरपरिषद कार्यालयात अनांगोदी कारभार चालू आहे तो थांबववा अशी मागणी केली. भिमराव लेंडे यांनी शेती मालाला भाव नाही बाजार  समिती भाजपच्या ताब्यात असून शेतीमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी केली. दिवाळी उत्सवा जवळ आला आहे तरी भारनियमन लवकरात लवकर बंद करावी अशी एक मुखी मागणी सर्व उपस्थितांनी केली आहे.
नगरपरिषदेच्या वतीने प्रकाश तापकिरे यांनी आंदोलकाचे  निवेदन स्विकारून कामे पुर्ण करु असे आश्‍वासान दिले. विकास मासाळ, विठठल कोकाटे मयुर मोहोळकर ,ऋषीकेश डुचे,  योगेश राळेभात सुनील जगताप, आनंद खरात, आसिफ शेख, झहीर शेख, संभाजी मुळे, जमीर सय्यद आदी युवक व नागरीक उपस्थित होते.