0
अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - नगर तालुक्यातील निंबळक येथे पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचे सर्व्हेक्षण अर्धवट राहिले आहे. गावातील घरकुल वंचितांचे सर्व्हेक्षण पुर्ण करण्याची  मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.या संदर्भातील  निवेदन निंबळक ग्रामस्थांच्या वतीने    गटविकास अधिकारी सौ.होजगे यांना देण्यात आले.
पंतप्रधान ग्रामीण आवस योजनेच्या ड यादीसाठी गावात समक्ष जावून सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी पंचायत समितीने ग्रामसेवक गिरी यांना दिली होती. मात्र गावातील अर्ध्या  भागांचे  सर्व्हेक्षण करुन अर्धा  भाग तसाच सोडून देण्यात आल्याने उर्वरीत भागातील घरकुल वंचितांची नोंद झालेली नाही. तरी तातडीने उरलेल्या घरकुल वंचितांचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी  ग्रामस्थांनी केली असून, सर्व्हेक्षण न झाल्यास ग्रामस्थ व महिला पंचायत समिती समोर शुक्रवार( दि.27  ऑक्टोबर) पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी  दिला.

Post a Comment

 
Top