Breaking News

विद्यार्थिनीशी अश्‍लिल वर्तन करणार्‍या शिक्षकाला अटक

बुलडाणा, दि. 12, सप्टेंबर - विद्यादानाचे पवित्र कार्याची जबाबदारी असणार्‍या एका 30 वर्षीय शिक्षकाने लहान भावास घेण्यास आलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा विद्येच्या पवित्र मं दिरातच विनयभंग केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील वडगाव डिघी येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी घडली असून या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी शिक्षकी  पेशाला काळीमा फासणार्‍या शिक्षकाविरुद्ध आज 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत सविस्तर असे की, काल पाऊस सुरु असल्याने इयत्ता तिसरीत शिकणार्‍या लहान भावाला घरी नेण्याकरीता त्याची 14 वर्षीय बहिण डिघी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक  शाळेत गेली. दरम्यान याच शाळेतील शिक्षक राजेश मारोती ढोले (वय-30 वर्षे) रा. मलकापूर या शिक्षकाने त्या मुलीस वर्गखोलीत बोलावून तिच्या भावाला फळ्यावर लिहिलेले वाचण्यास  सांगितले. दरम्यान तो विद्यार्थी फळ्यावरील वाचत असताना त्या शिक्षकाने त्याच्या बहिणीचा वर्ग खोलीतच विनयभंग केला व ही बाब कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी सुद्धा  दिली. घडलेला प्रकार त्या मुलीने घरी जावून नातेवाईकांना कथन केला. या बाबीचा जाब विचारण्यासाठी त्या मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट शाळा गाठत त्या शिक्षकाला चांगलाच  चोपही दिला. त्यानंतर मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जावून त्या शिक्षकाविरुद्ध मुलीने फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी शिक्षक राजेश ढोले विरोधात  अप.क्र.170/17 कलम 354, 506 भादंवि पोस्को 4 नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक साळुंके यांचे मार्गदर्शनात  सुरु आहे.