0
मुंबइ, दि. 11, ऑक्टोबर -  ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट ्वटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
हा विजय केवळ भाजपचा नसून ग्रामीण भागातील जनतेचा, शेतक-यांचा, तरूणांचा आणि गरिबांचा आहे. या सगळ्यांचा भाजपच्या विक ासाच्या कार्यक्रमाला पाठिंबा आहे, असे दिसून येत आहे, असेही मोदी यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. मोदी यांनी या विजयाबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

 
Top