Breaking News

गाडयांतील पेट्रोल चोरूत ते करायचे मौजमस्ती

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - रस्त्यावरच्या गाडयांतील पेट्रोल चोरूत मौजमस्ती करणार्या तरूणांच्या टोळीला पकडण्यात आज पोलिसांना यश आले आहे. सदर मुले ही आठरा वर्षापेक्षा कमी वयाची असून त्यांच्याकडू बुलेट, चार लिटर पेट्रोल आणि प्लास्टीक नळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.पुंडलीकनगर भागात राहणारे राजेंद्र होणाजी इंगोले यांच्यासह अनेकांच्या गाडयांतील पेट्रोल भरल्या दिवशीच संपत होते. या बाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्यात तपासले असता ही पोरे पध्दतशीरपणे पेट्रोल चोरी करत असताना दिसली त्यांचा माग काढुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ऋषिकेश संतोष पालोदकर(18,रा. गल्ली नंबर 7,पुंडलिकनगर) हा या टोळीचा प्रमुख असून गाडया चालवून मैजमस्ती करण्यासाठी चोरी केल्याचे आणि रोज कर्णपुरा देवीला बुलेटने गेल्याचे त्याने सांगितले.