Breaking News

अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. 11, ऑक्टोबर -अल्पवयीन पत्नीसोबत जबरदस्तीने ठेवलेल्या शारीरिक संबंधावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला  आहे. सज्ञान नसलेल्या पत्नीसोबत पतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कारच आहे, असा निकाल न्यायालयाने आज दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 375 मध्ये दिलेला अपवाद रद्द केला आहे. कलम 375 मध्ये 15 ते 18 वर्ष वयाच्या  पत्नीसोबत पतीचे शारीरिक संबंध बलात्कारच्या कक्षेतून बाहेर ठेवले आहेत. परंतु आता हा अपवादच रद्द करण्यात आला आहे. दरम्यान,  अशा प्रकरणात तक्रार करण्याचा अधिकार कोणाला असेल हे अद्याप स्पष्ट नाही.