Breaking News

यशस्वी विद्यार्थी हा अमृतवाहिनीचा अभिमान -आ. थोरात

माजी विद्यार्थ्यांनी जागविल्या आठवणी । मिलाप- 2017 उत्साहात संपन्न

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - उत्तम गुणवत्तेसह परिपूर्ण ज्ञानाची शिदोरी घेऊन जगभरात विविध पदांवर यशस्वीपणे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी हे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे माज़ी  शिक्षण व महसूलमंत्री, विद्यमान आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय मिलाप- 2017 या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, विश्‍वस्त शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़.ए़.व्यंकटेश, माजी विद्यार्थी प्रोटोटेक अ‍ॅनालायझर ग्रृपचे कार्यकारी संचालक प्रशांत कुलकर्णी, ग्लोबल आय. टी. चे संचालक दमनजीत सिंग, रिलायन्सचे अलोक भार्गव,  कार्यकारी अभियंता प्रविण कोल्हे, बंदुक्या या मराठी चित्रपटाचे मुख्य अभिनेते निलेश बोरसे, संस्थेचे व्यवस्थापक प्रा़.व्ही़ बी़.धुमाळ, रजिस्ट्रार प्रा़ विजय वाघे आदी उपस्थित होते़.यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला़.  सुमारे 800 माजी विद्यार्थ्यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना आ. थोरात म्हणाले की, 1983 पासून अमृतवाहिनीच्या विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी जगभरात यशस्वीपणे विविध पदांवर कार्यरत आहेत़.  हे माजी विद्यार्थी संस्थेचे प्रचारक आणि अनमोल ठेवा आहे़.  मागील 34 वर्षात अमृतवाहिनी संस्थेने सातत्याने गुणवत्ता राखली आहे़.  आज देशातील पहिल्या 10 महाविद्यालयात या ग्रामीण महाविद्यालयाचा होणारा समावेश ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे़.    काळानुरुप अनेक चांगले बदल झाले आहेत़.  प्रशस्त इमारती, आधुनिक व दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट निकालाची परंपरा, नोकरीची सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कायम अमृृतवाहिनी अग्रकम ठरली आहे़.   या सस्थेचे जगभरात विविध कंपन्यांसह प्रशासकीय सेवेत अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यावेळी बोलतांना आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, आजच्या मिलाप- 2017 मुळे सुमारे 800 माजी विद्यार्थ्यांचा मिलाप झाला आहे. नोकरी निमित्त धावपळ, दररोजचे कामकाज यातून वेळ काढून आपले महाविद्यालय, त्या काळातील मित्र यांच्या या निमित्ताने भेटीगाठी होऊन पुन्हा नवी उर्जा मिळणार आहे़.  मिलाप- 2017 हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनमोल ठेवा ठरणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे म्हणाले की, या माजी विद्यार्थी मेळाव्यातून सर्व जुन्या मित्रांचा एकमेकांशी पुन्हा नव्याने संवाद व्हावा, चर्चा व्हावी, कौटुंबिक स्नेह निर्माण व्हावा हा या कार्यक्रमागचा उद्देश आहे. ंविश्‍वस्त शरयू देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्राचार्य डॉ. एम़ ए़. व्यंकटेश यांनी महाविद्यालयातील निकाल, मानांकणे व नवनवीन उपक्रमांची माहिती देत वाटचालीचा मागोवा घेतला. याप्रसंगी निलेश बोरसे, अलोक भार्गव, प्रविण कोल्हे यांसह 30 ते 40 विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी क्रिकेट, पतंग, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, सायकलींग या खेळांचा आनंद लुटला. डान्स ड्रामा व गित गायनातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन झाले़.  हरिश्‍चंद्रगड व शिर्डी येथील भेटी संस्मरणीय ठरल्या़.   डी. जे. व कॅम्पफायरने या सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी गाढे व प्रा. प्रविण मेहेत्रे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. अशोक मिश्रा यांनी आभार मानले.