Breaking News

डॉ.सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमीत्त शासकीय रुग्णालयात महाप्रसाद वितरण

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - “जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा’’.याउक्तीची जाणीव ठेवुन गेल्या 269 आठवड्या पासुन  प्रत्येक गुरुवारी सरकारी दवाख्यान्यात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन स्वरुपात महाप्रसादाचे वितरण करण्यात येते.दवाखान्यात रुग्णांना भोजन मिळते परंतु नातेवाईकांना भोजन  मिळत नाही ही बाब बुलडाण्यातील सुरेशचंद्र गट्टाणी यांच्या लक्षात आली.
गट्टाणी यांनी हि गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगीतली आणि आठवड्यातील दर गुरुवारी रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन देण्याचे ठरले.गेल्या 269 आठवड्यापासुन सातत्याने  हे अन्नदानाचे  कार्य सुरु आहे. या अन्नदानाच्या कार्यास समाजातील सर्व धर्मातील अन्नदाते मदत करतात. 269व्या आठवड्याच्या अन्नदानाचे मानकरी होते बुलडाणा अर्बन पथसंस्थेचे मॅनेजिंग  डायरेक्टर डॉ सुकेश झंवर. डॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त्याने त्यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.यावेळी डॉ सुकेश झवर यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांच्या  प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सुरेशचंद्र गट्टाणी व प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी वाढदिवसाच्या निमीत्त शाल श्रीफळ देवुन शुभेच्छा दिल्या. या अन्नदानाच्या कार्यात सुरेशचंद्र गट्टाणी,विजु  वैद्य,रुपाशेठ उजैनकर, दिलीप राठोड, सुगदेव गायगोळ,प्रकाशचंद्र पाठक,माहेश्‍वरी युवा मंडळाचे सदस्य,जीव्न्व कांबळे,देवीदास वाघ,पांडुरंग कराळे, सुनिल सुर्यवंशी, जोशी महाराज,  शिवाजी देशमुख,विजुदादा कुळकर्णी,  शेख,पवार साहेब, बजरंग सोनी, तमीज मिर्जा यांचेसह अनेक या कार्यास तन मन धनाने मदत करतात.याप्रसंगी डॉ बाहेकर यांची उपस्थिती  होती.. या अन्नदानाच्या प्रत्येक  आठवड्याच्या गुरुवारी ना नफा ना तटा या तत्वावर आचारी अशोक पांचाळ स्वयंपाक करुन देणाचे काम करतात तर मनोज राजुरे हे याठिकाणी  शुध्द आरोच्या पाण्याचा  मोफत पुरवठा करतात. या अन्नदानाच्या कार्यक्रमात रुग्णांचे  नातेवाईक, व शहरातील गरजु नागरिक सहभागी होतात.