Breaking News

मुंबई साबांत कनिष्ठ वरिष्ठ अभियंत्यांचे संगनमत

बाईंना निलंबित करणे अशक्य -  आमदारांकडे चौकशी अधिकार्यांची निर्लज्ज कबूली

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर -सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराला कनिष्ठ वरिष्ठ एकमेकांना साक्षी असतात,नव्हे या भ्रष्ट प्रक्रियेत  सममुल्य सहभाग आणि नफ्याचा वाटा असतो,या आशंकेला मुंबई शहर इलाखा विभागाच्या उदाहरणाने खाञीत परावर्तीत केले  आहे.बाईंना निलंबीत करता येणार नाही,त्यांनी आम्हाला कोर्ट कामात मदत केली आहे,आम्ही अडचणीत येऊ. अशी विनवणी करणारे  जोशी-सुर्यवंशीच्या स्वार्थामुळे कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचे निलंबन टाळले.मनोरा आमदार निवास इमारतीशी संबंधीत या  गैरव्यवहारात मुख्य संशयितांना वाचविण्याचे कटकारस्थान उघडे पडले आहे.
मनोरा आमदार निवासातील अनेक आमदारांच्या खोल्यांमध्ये किरकोळ दुरूस्तीच्या नावाखाली कामे न करता खोट्या मोजमापाची नोंद क रून करोडो रूपये शासकीय निधीची अफरातफर  केल्याची बाब उघड झाली.काही लाखांच्या कामावर करोडो रूपयांचा खर्च झायाची बाब  निदर्शनास आल्यानंतर आ.चरण वाघमारे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून सत्य पडताळून पाहीले.या कामाच्या निविदा खोट्या,क रारनामे खोटे,वर्क आर्डरही बनावट,प्रत्यक्षात कामे न करता मोजमाप पुस्तिकेत नोंदी केल्याने त्याही खोट्याच.या खोटैपणातून तब्बल  पावणे चार कोटीच्या शासकीय निधीचा अपहार मुंबई शहर इलाखाच्या अभियंत्यांनी केल्याची तक्रार आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंञी  देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंञी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.त्या दोघांनीही या तक्रारीच्या अनूषंगाने चौकशीचे आदेश  दिले.इथपर्यंत सारे सुरळीत पार पडले.
साबां प्रधान सचिव  आशिषकुमार सिंग यांनी मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना 7 आगस्ट 2017 रोजी चौक शीचे आदेश देऊन दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश जारी केले.इथेच या प्रकरणाला पहिला थांबा मिळाला.
अरविंद सुर्यवंशी हे चौकशी अधिकारी असले तरी ज्यांची चौकशी करण्याचे शिवधनूष्य उचलायचे होते ते सारे संशयीत त्यांच्याच क ार्यगोतावळ्यातले.वेगळ्या शब्दात चौकशी अधिकारी संशयितांच्या कार्यालयीन कुटूंबातील.त्याही पेक्षा अनेक भानगडीत एकमेकांना सहक ार्य केलेले,कधी कधी एकञ भानगड उभी केलेले.मग आपल्याच माणसांची चौकशी करण्याचे हे अवजड काम खांद्यावर टाकले गेले.तेही दोन  दिवसात पुर्ण करून अहवाल सादर करायचा? हे पाप करण्याचे धाडस काही साबांचे तपासी अमलदार अरविंद सुर्यवंशी यांनी केले नाही.प रिणामी  प्रधान सचिवांनी दिलेली दोन दिवसांची मुदत टळून गेली.खरे तर इथेच वरिष्ठांच्या आदेशाची पहिली अवज्ञा झाली होती.
अरविंद सुर्यवंशी यांनी चौकशी अधिकारी म्हणून कर्तव्यात कसूर केली ही बाब लक्षात आल्यानंतर मुळ तक्रार कर्ते आ.चरण वाघमारे यांनी  पुन्हा प्रधान सचिवाःची भेट घेऊन या संदर्भात नाराजी व्यक्त केली.चौकशी आधिकारी आपला सहकारी धर्म पाळीत असून तपास अधिकारी  आणि अपहार प्रकरणातील संशयित यांच्यात संगनमत झाल्याचा आरोप त्यांनी केला.साबां मंञ्यांचीही भेट घेऊन चौकशीस जाणीवपुर्वक  प्रलंबित केले जात असून दोषींना वाचविण्याचा खटाटोप सुरू असल्याचे ना.पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.साबां मंञ्यांनी पुन्हा  आदेश जारी करून चौकशी अहवाल सदर करण्यास फर्मावल्यानंतर चौकशीचा फार्स करण्यात आला.तब्बल तीन महीन्यांनंतर 4 आक्टोबर  2017 रोजी चौकशी अधिकारी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी सकाळी 11 वा.सुमारास मनोरातील बी - विंग मधील 95 क्रमांक ाच्या खोलीची पाहणी केली.ही खोली आ.वाघमारे यांच्या नावे आरक्षित आहे.मोजमाप पुस्तिकेत या 95 बी या खोलीचा उल्लेख केलेला  असतांना ही कंसात माञ 124 ड असा उल्लेख केल्याचे दिसते.ही अतिरिक्त नोंद चौकशी दरम्यान केल्याचा स्पष्ट आरोप आ.चरण वाघमारे  यांनी केला.प्रकरण घडून गेले.पण पचवण्यापूवीच ते नजरेत आले.मधला मार्ग काढून आपल्या कार्यकुळातील सहकार्यांना वाचविण्याची सर्व  धडपड चौकशी अधिकार्यांनी केली.दोषी अभियंत्यांना पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने मोजमाप पूस्तकात बदल करण्याची पुरेशी संधी मिळावी  म्हणून प्रधान सचिवांनी आदेशान्वित केलेली दोन दिवसांची मुदतही धाब्यावर ठेवून वरिष्ठांची अवज्ञा केली.संशयितांनीही या जवळपास  महिना दिड महिना अलिखीत मुदतवाढीचा फायदा उठविल्याचे मोजमाप पुस्तकात खाडाखोड केलेल्या नोंदी सांगतात.केवळ एक नव्हे तर  तब्बल 31 आमदारांच्या खोल्यांच्या कामाची बोगस नोंद करून पावणेचार कोटी रूपयांचा शासकीय निधी परस्पर हडप करण्याचा डाव  फसला.आ.वाघमारे यांनी पिच्छा पुरविल्याने कारवाई करणे अत्यावश्यक होते.नाईलाज झाला चौकशी अधिकार्यांचा.कारवाईचा अजेंठा नि श्‍चित झाला.श्रेणी एक मधील तत्कालीन सहउपअभियंता भुषण फेगडे आणि केशव धोंगडे  या दोघांना निलंबित करायचे,कार्यकारी अ भियंत्यांना अभय देत जुजबी कारवाई करायची.माञ त्यासाठी ज्यांनी हे प्रकरण गांभिर्याने हाताळले ते आ.वाघमारे यांना विश्‍वासात घेतल्या शिवाय  ही खेळी यशस्वी होणार नाही हे पक्के ठाऊक असल्याने कारवाईचा आदेश काढण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि.6  आक्टोबर रोजी राञी 10.20 वा.साबां सचिव (रस्ते) सी.पी.जोशी आणि या प्रकरणाची चौकशी करणारे अधिक्षक अभियंता अरविंद  सुर्यवंशी यांनी आमदारांची मनधरणी करण्यासाठी सी विंग मधील रुम नंबर 343 चा दरवाजा ठोठावला आणि बाईंना (कार्यकारी अभियंता  प्रज्ञा वाळके) आम्हाला निलंबित करता येणार नाही,त्यांचे आमच्यावर उपकार आहेत.अशी विनंती केली.या चर्चेत बरीच खडाजंगी  झाली,वाघमारे आपल्या भुमिकेवर ठाम राहीले.ईकडे दुसर्या दिवशी शनिवार दि.7 आक्टोबरला बर्याच घडामोडी घडल्या त्यांचा परामर्श घेऊ  उद्याच्या अंकात.
प्रधान सचिवांकडून एसीबी चौकशीचे आश्‍वासन
दि.7 -10-2017 शनिवार....मुंबई शहर इलाखाच्या दृष्टीने काळा दिवस.म्हटले तर गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या दोषींवर क ारवाईची सुरूवात झाली ही सकारात्मक बाब.माञ एकाच टोळीतील सदस्यांना एकाच प्रकारच्या गुन्ह्यात वेगवेगळी सजा,विशेष म्हणजे  टोळीच्या सरदाराला माफीचे साक्षीदार करावे या प्रमाणे जूजबी शिक्षा असा न्याय ..
6 आक्टोबरच्या राञी कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करणे अशक्य असल्याचे जोशी - सुर्यवंशीनी संकेत दिले होते,संभाव्य कारवाईचा  अंदाज आल्या नंतर आ.चरण वाघमारे यांंनी 9422131246 या भ्रमणध्वनी वरून साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांच्याशी  9820011131 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून परिस्थिती निदर्शनास आणली.काय घडले आणि का घडले याचा अचूक अंदाज आलेल्या  प्रधान सचिवांनी आ.वाघमारे यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मनोरा आमदार निवास इमारत गैरव्यवहार तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाकडे सोपविण्यासाठी तात्काळ पञ लिहीण्याचे आश्‍वासन दिले.त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता राजू खरे यांनी आ.वाघमारे यांचे  पञवजा निवेदन प्रधान सचिवांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाधीन केले.