Breaking News

मराठी भाषा, साहित्य विकासासाठी साहित्य महामंडळांना दुप्पट अनुदान

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - विविध वाड्मयीन उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्य विकासाचे कार्य करण्यासाठी अखिल  भारतीय मराठी साहित्य महामंडळासह इतर सहा प्रादेशिक साहित्य संस्थांना राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान दुप्पट करण्यात  आले असून आता या संस्थांना 10 लाख रुपये एवढे अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मराठी भाषा आणि साहित्य विकासासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व या महामंडळाच्या चार घटक संस्था म्हणजेच पुणे  येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ, नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ आणि औरंगाबाद येथील  मराठवाडा साहित्य परिषद तसेच रत्नागिरी येथील कोकण मराठी साहित्य परिषद आणि कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा  अशा सात प्रादेशिक साहित्य संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे संवर्धन, अभिसरण आ णि विकास करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. केवळ साहित्यावरील चर्चा व परिसंवाद एवढेच कार्यक्रमाचे स्वरुप राहू नये तर  मराठी आणि इतर भारतीय भाषा यांच्यामध्ये परस्पर साहित्य व्यवहार वाढविण्यासाठीही प्रयत्न व्हावेत तसेच मराठी भाषेचे अंगभूत  सामर्थ्य ओळखून आधुनिक आणि गतिमान युगातील आव्हाने पेलण्यासाठी मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून सर्वार्थाने विकसित क रण्यासाठी उपक्रम हाती घेतले जावेत यासाठी त्यांना देण्यात येणारे अनुदान वाढविण्यात आले आहे. प्रादेशिक साहित्य संस्थेच्या क ार्यक्षेत्रातील भागांमधील बोली भाषा, साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आज वाढविण्यात आलेल्या अनुदानाचा उपयोग  होणार आहे.