Breaking News

एका दिवसांत एक कि.मी.चे काँक्रीटीकरण करणारी मशिन माजलगावमध्ये दाखल

बीड, दि. 11, ऑक्टोबर - खामगांव - पंढरपुर या 435 किमी लांबीच्या राष्ट्ीय महामार्गाच्या सिमेंट-काँक्रीटकरणाच्या कामाला आज  माजलगाव येथून सुरुवात झाली . या वेळी माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर. टी. देशमुख व कार्यकारी अभियंता उदय  भरडे उपस्थित होते. हे काम अत्याधुनिक मशीनने होणार असून सात कोटी रूपयांची ही मशिन आहे या मशिनचा वेग प्रचंड असून एका  दिवसांत एक किलोमीटर रस्ता ही मशिन पुर्ण करणार आहे. माजलगांव - केज हा पहिला टप्पा नंतर पुढचे काम होणार आहे.