Breaking News

क्रिमिलेअरमधून जाती वगळण्याबाबत हरकती सूचना करण्याचे आवाहन

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल क्र.49 शासनास सादर झाला आहे. या अहवालाच्या यादीतील क्र. 1 व 2 (परिशिष्ट अ) मध्ये अनुक्रमे विमुक्त  जाती (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या 14जाती (यादी क्र.1) भटक्या जमातीच्या (ब) यादीमध्ये समाविष्ट असलेल्या 23 जाती व विमाप्र प्रवर्गातील अनुक्रमांक 7 मधील 1 जात (यादी  क्र.2) अशा जाती क्रिमिलेअरच्या तत्वामधून वगळता येऊ शकेल अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. या संदर्भात जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
या शिफारशीच्या अनुषंगाने सदर यादीतील समाविष्ट करण्यात आलेल्या जाती/जमातींना क्रिमिलेअरच्या तत्वांमधून वगळण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून या संदर्भात जनतेच्या  सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. जनतेच्या माहितीसाठी आयोगाचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या ुुु.ारहरीरीीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या अनुषंगाने जनतेच्या काही हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी भा. रा. गावीत सह सचिव विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभाग, दालन क्र 153 विस्तार पहिला मजला मंत्रालय  मुंबई-32 यांना पत्राद्वारे अथवा लहर्रीीरे.सर्रींळींपळल.ळप या ई-मेलवर प्रसिद्धी दिनांकापासून 15 दिवसांच्या कालावधीत सादर कराव्यात असे,आवाहन अवर सचिव, विजाभज, इमाव व  विमाप्र कल्याण विभाग यांनी केले आहे.