0
पुणे, दि. 09, ऑक्टोबर - माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू गवई यांचे व्यक्तीमत्व चतु:रस्त्र होते. महाराष्ट्र विधीमंडळातील  वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला त्यांच्या जीवनावर आधारित आजातशत्रू हा स्मृतिग्रंथ त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा  असल्याचे गौरोदगार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले. 
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू. उपाख्य  दादासाहेब गवई यांच्या जीवनावर आधारीत आजातशत्रू हा स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या स्मृतिग्रंथात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश  करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या लेखाचाही या ग्रंथात समावेश आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने व विशेष  कार्य अधिकारी राजेंद्र संखे यांच्या हस्ते पाषाण येथील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रायगड या निवासस्थानी या स्मृतिग्रंथाची प्रत त्यांना भेट देण्यात  आली. यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या कक्ष अधिकारी सुनंदा देसाई, सहाय्यक कक्ष अधिकारी संजना मठकर उपस्थित होत्या. 

Post a Comment

 
Top