Breaking News

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचे मोलाचे योगदान - एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 13, ऑक्टोबर - या शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्‍चितपणे या शहरासाठी होत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक  बांधकाम (सार्व.उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 
सदर कार्यक्रम महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते  दिलीप बारटक्के, नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले, ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संघाच्या अध्यक्षा आसावरी फडणीस आदी उपस्थित होते.
राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या या समारंभामध्ये समाजासाठी भरीव योगदान देणा-या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, सभागृह नेते यांच्या हस्ते  शाल, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ.आसावरी फडणीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या जागतिक  ज्येष्ठ दिनाच्या निमित्ताने ॠध्यास द एन्टरटेनर्सॠ निर्मित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.