Breaking News

विक्रोळीत मासे विक्रेत्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील मासे विक्रेते तसेच फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करून स्थानक परिसर साफ केला आहे. विक्रोळी पूर्वेकडील रेल्वे स्थानक मार्गाजवळ 30 ते 35 मासे विक्रेते बसत असून यामुळे नागरिकांना चालण्यास आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. या फेरीवाल्यांना यापूर्वी हटवून कांजूर मार्ग येथे जागा देण्यात आली. तरीही येथे हे मासे विक्रेते बसत होते. अखेर या सर्व मासे विक्रेते आणि फेरीवाल्यांवर रेल्वेच्या आरपीएफ व सामान्य रेल्वे पोलिसांनी क ारवाई केली.