Breaking News

पावसाने पालिकेचे पितळ उघडे; रस्त्यांवर खड्डे अन दलदल

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - सोमवारी सकाळी 10.40 च्या दरम्यान झालेल्या पावसाने मनपाचे पितळ उघडे पाडले आहे. दोन  दिवसांच्या जोरदार  पावसाने रस्ते दलदलयुक्त बनले   आहेत. मैलामिश्रीत पाणीही रस्त्यावरून वाहत आहे. शहरात रस्त्यांची दर्जेदार कामे  केल्याचा तोरा मिरवणारी महापालिका या पावसाने मात्र तोंडघशी पडली असल्याचे चित्र आहे. पावसाने रस्त्यावर खड्डे पडले असून  रस्त्याची कामे किती दर्जेदार करण्यात आली आहेत, हे स्पष्ट चित्र सर्वसामान्यांना पहायला मिळत आहे. पालिकेने रस्त्याच्या कामासाठी  खर्च केलेले लाखो रूपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
विकाय आणि सुंदर नगरच्या गप्पा मारणार्‍यांचे ताेंंड या पावसाने बंद केले आहे. रस्त्यावर सर्वत्र पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या  पाण्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. तर रस्त्यावरुन ये-जा करताना विद्यार्थी आणि भाजीविक्रे त्यांची चांगलीच तारंबळ उडाली होती.
शहरातील अनेक भागात मुरूम टाकून दुरस्त केलेल्या रस्त्यांची वाताहत झाली असून रस्ता पुर्णपणे उखडला आहे. तर अनेक ठिकाणी ड ्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले आहे. पावसाने सगळा मुरूम वाहून गेला आहे. दिल्लीगेट, माळीवाडा,  गांधीमैदान, आशा टॉकीज चौक परिसरात  नेहमीप्रमाणे पाणी साचल्याने नागरिकांना अतोनात हात सहन करावे लागले.