0
मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला वाचन प्रेरणा दिवस आज (दि 13) राज  भवन येथे साजरा करण्यात आला. राज्यपालांचे परिवार प्रबंधक वसंत सांळुके यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकार्‍यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली  वाहिली. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने राज भवन येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 15 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने वाचन प्रेरणा  दिवस आज (दि 13 ऑक्टोबर) साजरा करण्यात आला.

Post a Comment

 
Top