0
भोपाळ, दि. 05, ऑक्टोबर - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र  सरकारला दिली आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत सर्व राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेता येतील. त्यासाठीची सर्व सुरु असल्याचं निवडणूक  आयोगाने स्पष्ट केलं.
लोकसभेबरोबरच राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या दिशेने केंद्र सरकारने यापूर्वीच हालचाली सुरू केल्या आहेत. सतत होणार्‍या विधानसभा  निवडणुकांमुळे सरकारी कार्यप्रणालीवर परिणाम होतो. शिवाय देशावर आर्थिक ताण पडतो. त्यामुळे या निवडणुका एकत्र घेण्यावर जोर दिला जात आहे.

Post a Comment

 
Top