Breaking News

मुंबई काँग्रेस व आरे बचाव समितीतर्फे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन विरोधात तक्रार दाखल

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - मुंबईचा श्‍वास असलेल्या आरे विभागात मेट्रोचे कार शेड नको याबाबत मुंबई काँग्रेस आणि आरे बचाव समितीने वेळोवेळी भाजप सरकारकडे तक्रारी दाखल के लेल्या आहेत, परंतु याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मुंबईतील प्रमूख बिल्डरसाठी हे संपूर्ण कारस्थान रचलेले आहे. हि जागा वन विभागाची असून हि सर्व नियम धाब्यावर  बसवून मेट्रो कार शेडचे काम सुरु करण्यात आले आहे. याचाच निषेध म्हणून मुंबई काँग्रेस, आरे बचाव समिती आणि स्थानिक रहिवाशी यांना घेऊन आज सकाळी आरे पोलीस स्टेशनमध्ये  या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मुंबईत कुलाबा, कांजूरमार्ग, कालीना आणि महालक्ष्मी या ठिकाणी मेट्रो कारशेडसाठी जागा सहज उपलब्ध असूनही भाजपा सरकार काही  प्रमुख बिल्डरांच्या फायद्यासाठी आरेमध्येच हे कार शेड तयार करण्याचा घाट घालत आहे . हा मुंबईकरांवर अन्याय आहे. मेट्रो कार शेडचे काम ताबडतोब थांबले नाही तर लवकरात लवकर  आम्ही आंदोलन करू असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.
ते पुढे म्हणाले कि आम्ही कोर्टात आणि राष्ट्रीय हरित लवादा (छॠढ) कडे हि तक्रार दाखल केलेली आहे तरी हि हे सरकार त्यांना हि न जुमानता मेट्रो कार शेडचे काम सुरु करत आहे.  याला आमचा विरोध आहे. म्हणूनच आम्ही लवकरात लवकर आंदोलन उभारणार आहोत. याचेच पहिले पाऊल म्ह्णून आम्ही आज आरे पोलीस स्टेशनमध्ये या कामाच्या विरोधात तक्रार  दाखल केलेली आहे.