Breaking News

मुख्यमंत्री दोन दिवसांच्या स्वीडन दौर्‍यावर रवाना

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - स्वीडनमध्ये होत असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक प्रदर्शनास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहाटे रवाना झाले असून या दोन  दिवसीय दौर्‍यात ते मेक इन इंडिया अभियानांतर्गत राज्यातील गुंतवणूकीसाठी विविध उद्योगसमुहांशी चर्चा करणार आहेत.
स्वीडन एक्स्पो-2017 या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रमात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. या शिष्टमंडळात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य  सचिव सुमित मल्लिक आदींचा समावेश आहे. या दौर्‍यादरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक व्हावी यासाठी मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध महत्त्वाच्या  उद्योगसमुहांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय स्वीडनचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री, वाणिज्य आणि व्यापार मंत्री यासोबतच विविध क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या भेटी घेणार  आहेत.