0
पुणे, दि. 05, ऑक्टोबर - येरवडा ते विश्रांतवाडी या दरम्यानच्या बीआरटी मार्गात एका स्विफ्ट चालकाने बेकायदा प्रवेश करत पीएमपीएमल बसला धडक दिली.  या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात काल सायंकाळी 5.15 वाजता संगमवाडी जवळ  झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीहून कोथरूडच्या दिशेने निघालेली बसला संगमवाडी जवळ बिआरटी मार्गात घुसखोरी केलेल्या स्विफ्टच्या  चालकाने समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये कारचालकाच्या ओठाला किरकोळ स्वरुपाची जखम झाली आहे. दरम्यान याप्रकरणी बीआरटी मार्गात घुसखोरी  केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Post a Comment

 
Top