0
औरंगाबाद, १० ऑक्टोबर - गोपीनाथ गड असेल्या पांगरी गावात ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यात पंकजा मुंडेंना अपयश आले आहे. या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाने विजय मिळवला आहे. बारा सदस्य असणा-या या ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे गटाचे दहा सदस्य निवडून आले आहेत. तसेचसरपंचपदीही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. या ठिकाणी नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी पुरस्कृत तर चार भाजप पुरस्कृत होते. सरपंचपदही राष्ट्रवादीच्या वाटयाला आले. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ज्या गावात गोपीनाथ गड उभारला त्या पांगरी गावच्या ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. परळी विधानसभा मतदार संघात अनेक ग्रामपंचायतीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत आहे.

Post a Comment

 
Top