0
लातूर, दि. 05, ऑक्टोबर - लातुर नजीक काल पानचिंचोली येथे झालेल्या निवडणूक प्रचाराच्या काळातील दंगल प्रकरणी अटक केलेल्या गोपाळ हलगुंडे, जुलेश  पवार, कौस्तुभ सोनवणे, सुरेश जाधव, फैय्याज सय्यद, ओमप्रकाश दिवे, धीरज म्हस्के आदी 10 जणांची आज झाली जामीनावर सुटका करण्यात आली असून  सध्या गावातील परिस्थीती नियंत्रणात आहे.प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त तसाच ठेवण्यात आला आहे . काल ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात पैसे वाटप केल्याच्या  आरोपावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाल्याने पोलिसांनी या दहाजणांना अटक करून जमावबंदी लागु केली होती.

Post a Comment

 
Top