Breaking News

अकोल्यात जिवाजी महाला चौकाचे नामकरण

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - जिवाजी महाला जयंतीचे औचित्य साधुन जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने शहरातील मॉडर्न हायस्कुल जवळील  चौकाचे जिवाजी महाला चौक असे नामकरण करण्यात आले.
नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी यांच्या हस्ते जिवाजी महाला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. धुमाळ  यांनी सदर ठिकाणी सुभोभिकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन दिले.
नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण चौधरी, लक्ष्मण आव्हाड, नगरसेवक प्रमोद मंडलिक, सौ.सोनाली नाईकवाडी, अगस्तीचे संचालक महेश नवले, ज्ञानवर्धिनीचे प्राचार्य रावसाहेब  नवले, संभाजी ब्रिगेडचे राज्य सचिव डॉ.संदिप कडलग आदींची भाषणे झाली.
कुंभार समाजाचे अध्यक्ष रमेश भालेराव, नगरसेवक सचिन शेटे, भोईर मॅडम, मॉडर्न हायस्कुलचे प्राचार्य सोनवणे, बाळासाहेब राऊत, योगेश जोशी, उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष  गुरकुले, महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे उपस्थित होते.