0
नवी दिल्ली, दि. 04, ऑक्टोबर - श्रीलंका भारत दौर्‍यावर येत आहे. बीसीसीआयने या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान होणार्‍या या मालिकेत तीन कसोटी, तीन वडे आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. कोलकात्यातील ईडन गार्डनवर सुरुवातीला 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सराव सामना खेळवण्यात येईल. कसोटी मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
दुसरा कसोटी सामना नागपुरात 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, तर अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना दिल्लीत 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येईल. वन डे  मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून धर्मशालेच्या मैदानातून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना मोहालीत 13 डिसेंबर रोजी, तर तिसरा आणि अखेरचा 17  डिसेंबरला विशाखापट्टणमला होईल. टी-20 मालिकेची सुरुवात 20 डिसेंबरपासून कटकच्या मैदानातून होणार आहे. तर दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये  आणि तिसरा सामना 24 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवण्यात येईल.

Post a Comment

 
Top