Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक झाली सोशल मिडियावर व्हायरल!

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - तालुक्यातील दहा ग्रामपंचायत निवडणुची रानधुमाळी जोरात सुरु आहे. पूर्वी निवडणुकीचा प्रचार म्हटले, की भिंतीवर जाहिरात करणे, उमेदवारांची माहिती पत्रक वाटप करणे अशा पद्धतीने प्रचार होत होता. आता मात्र या सोशल मिडियाच्या जमान्यात निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच गावच्या सरपंच आणि इच्छुक उमेदवारांची नावे असलेली लिंक देऊन कोण होणार गावचा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य याचे जोरदार सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे पूर्वीची पारंपरिक ग्रामपंचायत निवडणूक सोशल मिडियावर कधीच व्हायरल झाली आहे.    श्रीगोंदा तालुक्यातील दहा पैकी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे पँनल तयार झाले असून प्रचारसुद्धा सुरु झाला आहे.  तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाचे असणारे गावाची निवडणूक असल्याने नेत्यासाठी या निवडणूक प्रतिष्ठा असणार्‍या आहेत. काष्टीत माजी मंत्री बबनराव पाचपुते त्यांचे बंधू जिल्हा परिषद् सदस्य सदाशिव पाचपुते यांच्या पँनल विरोधात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थकाचा पँनल आहे . बेलवंडी मधे माजी जिल्हा पारिषद् उपाध्यक्ष आंणासाहेब शेलार यांच्या पँनल विरोधात पाचपुते समर्थकाचा पँनल आहे. पारगाव सुद्रिकमधे पाचपुते समर्थक आणि नागवडे , जगताप समर्थक यांचा पँनल आहे.  घोगरगाव मधे माजी जिल्हा पारिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस समर्थक पँनल विरोधात आ. जगताप समर्थकांचा पँनल आहे. बनपिप्रीमधे ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाल्याने फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. तिथे जिल्हा पारिषद् सदस्य पती सचिन  जगताप यांचा पँनल आहे. अशीच परिस्थिती माठ , तांदली दुमाला, चवर सांगवी, तरड़ गव्हाण या गावातही आहे. माजी मंत्री पाचपुते  यांचे समर्थक विरुद्ध आ. जगताप, नागवडे समर्थकाचे पँनल उभे आहेत. श्रीगोंदयात सोशल मिडियावर एक्झिट पोल घेण्यात येत आहे. कोण होईल उद्याचा  श्रीगोंद्याचा आमदार, कोण  होईल, आमुक गावचा  सरपंच कोण अशा बाबींचे पोलखोल तालुक्यात सुरु आहे.