0
लाहोर, दि. 11, ऑक्टोबर - प्रसिद्ध पाकिस्तानी नाट्यअभिनेत्री शमिमची (वय 29 वर्ष) आज गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  मुल्तानमधील शाह टाऊनमध्ये असलेल्या घराबाहेर आज सकाळी तिचा खून झाला.
कोणीतरी तिला कॉल करुन बाहेर बोलावलं. जेव्हा ती घराच्या मेन गेटमधून बाहेर पडली तेव्हा अज्ञाताने तिच्यावर गोळीबार केला, ज्यात  तिचा जगीच मृत्यू झाला, अशी माहिती शमिमचा भाऊ सैफूर रहमानने पोलिसांना दिली आहे. नाटकांमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या  बहिणीला काही दिवसांपासून धमकीचे कॉल येत होते, असंही सैफूर रहमाननने सांगितलं. तर शमिमच्या हत्येमागे तिच्या नवर्‍याचा हात  असू शकतो असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

 
Top