Breaking News

बारामतीत शिवसेना शहरप्रमुखाच्या कारने दोन मुलींना चिरडले; जमाव संतप्त

पुणे, दि. 12, ऑक्टोबर - शिवसेना शहरप्रमुखाच्या भधाव कारने चिरडल्यामुळे दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बारामती- मोरगाव रस्त्यावर झाला.  अपघातानंतर संतप्त जमावाने कार पेटवून दिली. कारचालक पप्पू माने फरार झाला आहे.समिक्षा मनोज वीटकर (वय-13) आणि दिव्या ज्ञानेश्‍वर पवार (वय- 14) अशी मृत्यू झालेल्या  मुलींची नावे आहेत.