Breaking News

दिवाळीच्या दिवशी वृत्तपत्र विक्रेते जाणार संपावर

बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी दि.9 ऑक्टोबर राजी राज्यभर काळ्या  फिती लावून व डोक्यावर काळी पट्टी लावून पेपर वाटप केले. या राज्यस्तरिय संपात बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेने सक्रिय  सहभाग नोंदवून काळ्या फिती लावून पेपर वाटप केले आहेत. 
दि.3 ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्हा वृत्तपत्र संघटनेची व विदर्भातील 18 तालुक्यातील विक्रेत्यांची बैठक बुलडाण्यात पार पडली. या बैठकि त वृत्तपत्र विक्रेते कमिशन वाढ, दैनंदिन पुरवणी टाकणावळ, साप्ताहिक पुरवणी टाकणावळ, नैमीत्तीक पुरवणी टाकणावळ, पुस्तक  पद्धतीच्या पुरवण्या व पाऊच टाकणावळ, कॅलेंडर हाताळणी, कामगार दिन व अनंत चतुर्योदशी सुट्टी या व अशा अनेक मागण्यांसाठी विविध  वृत्तपत्र मालकांना विक्रेत्यांनी निवेदने दिली आहेत. त्या निवेदनावर वृत्तपत्र मालकांनी योग्य तो निर्णय घेवून मागण्या पुर्ण कराव्यात असे  साकडे घातले आहे. जर या मागण्यापुर्ण न झाल्यास 9 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून पेपर वाटप करणे, दि.17 ऑक्टोबर रोजी  पुरवणीवर बहिष्कार घालून वाटप न करणे, लक्ष्मीपुजन च्या दिवशी दि.19 ऑक्टोबर रोजी पुर्ण वितरणावर बहिष्कार टाकुन एकही वृत्तपत्र  वितरण न करण्याचा निर्णय जिल्हा वृत्तपत्र संघटनेने घेतला आहे.
यावेळी समीर शिंदे, राजेंद्र टिकार, उमेश देशमुख, गोविंद तायडे, रत्नदिप तायडे, धनराज दहे, जगदिश कोथळकर, सुंदर चौधरी, गणेश  उगले, सचिन निमकर्डे, रविंद्र चिंचोळकर, सुरेंद्र चिंचोळकर, सचिन गुरव, संजय जैन, श्रीकांत चवरे, निलेश एकडे, संजय जैन, संदिप  चिंचोळकर, संदिप जाधव, अनिल सरसंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दै.लोकमंथन नियमित वितरण होणार
दै. लोकमेथन ची वितरण व्यवस्था अगदी चोख असून वृत्तपत्र विक्रेत्यांना नेहमी सहकार्याची भावना ठेवून वेळोवेळी योग्य मोबदला  आजपर्यंत देण्यात येत असल्याने दै. लोकमंथन ची वितरण व्यवस्था सुरळीतपणे राहणार आहे. आपला अंक घरपोच मिळविण्यासाठी  आपल्या भागातील वितरकांशी संपर्क साधावा. दै. लोकमंथन परिवार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी आहे.