0
बीड, दि. 05, ऑक्टोबर - बीडमधुन जाणारा सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता आ.विनायक मेटे यांच्या हस्ते झेंडा दाखवून वाहनांसाठी खुला  करण्यात आला.बिंदुसरा नदीवरील जुना पुल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला होता तर दुर्देवाने पर्यायी पुल पावसामुळे वाहुन गेला होता त्या मुळे सगळी  वाहनें शहरातूनच जात होती. आता हा सस्ता सुरू करून दिल्याने बीड शहराची वाहतुक समस्या सुटली आहे. या वळण रस्त्यासाठी विनायक मेटे यांनी पाठपुरावा  केला होता आणि मुख्यमंत्र्यांनीही तातडीने मंजुरी देवून हं काम लवकर करवुन घेतले होते.

Post a Comment

 
Top