Breaking News

निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएम व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

नांदेड, दि. 03, ऑक्टोबर - जुन्या नांदेड भागात नगरपालिका निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात  आठजण जखमी झाले असून दोनही गटांनी परस्परा विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.या हाणामारीत  एमआयएमचे अध्यक्षसहि सहभागी होते.
जुन्या नांदेड भागात मनपा निवडणूकीचा प्रचार सुरू असताना एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले सस्ता सोडण्याच्या कारणावरून दोघांत वाद  होवून हाणामारी झाली यात हॉकी स्टीकचा वापर करण्यात आला होता.यात काँग्रेस कार्यकर्ते नासेर यांच्यासह दोनही गटाचे मिळून आठजण जबर जखमी झाले. रात्री  कॉग्रेसचे अब्दुल करिम मुख्तार यांच्या तक्रारीवरून एमआयएमचे अध्यक्ष सय्यद मोईन व इतरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आज पहाटे  आठ जणांना अटक करण्यात आली आहे.