Breaking News

राजेश्‍वरी बांदेकर यांची विश्‍वकोश विज्ञान लेखकपदी निवड

कोल्हापूर, दि. 12, ऑक्टोबर - येथील मुक्त पत्रकार राजेश्‍वरी रुपचंद्र बांदेकर (पूर्वाश्रमीच्या राजश्री पांडुरंग मोरे ) यांची महाराष्ट्र राज्य विश्‍वकोश निर्मिती मंडळाने विज्ञान लेखक म्हणून निवड  केली आहे. मंडळाने त्यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
बांदेकर या स्थापत्य अभियंता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी  त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली असून वैद्यकीय क्षेत्रातील जनसंपर्क : तुलनात्मक अभ्यास या विषयावर विशेष संशोधन केले आहे. क ोल्हापुरातील बहुतेक लिखित माध्यमांसाठी त्या मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. विश्‍वकोशासाठी विज्ञान लेखक म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.