Breaking News

परळीमध्ये पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

बीड, दि, 12, ऑक्टोबर - नदीत पोहायला गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडू लागली तेव्हा त्यांना वाचवायला गेलेल्या मुलासह तिघेही नदीच्या पाण्यात बुडून मरण पावली. ही घटना  आज बुधवारी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यचू परळीतील बर कत नगर भागात धनशी नदीच्या पात्रात घडली. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने खूप  दिवसानंतर या नदीला खूप पाणी आले आहे. या नदीवर बांधलेल्या बंधार्यात साठलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने फुलेनगर येथील उमेश चाहुरकर वय 13 व सिद्धार्थनगर येथील राष्ट ्रपाल गायकवाड वय 15 हे दोघे तिकडे गेले. तेथे पाण्यात उड्या मारल्या नंतर ते पाण्यात बुडू लागले. तेव्हा हे दोघे बुडत असल्याचे पाहून बरकत नगर येथील शाहिद कुरेशी वय 22 सहा  त्यांना वाचवण्यासाठी तिकडे धावला आणि पाण्यात उडी टाकली. मात्र तो खड्ड्यात पडून जखमी झाला. त्याला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यातदाखल करण्यात आले मात्र उपचार  चालू असताना तो मरण पावला. पोहण्यासाठी उतरलेली दोन मुले अजून गायब असून त्यांची दप्तरं बंधार्याकाठी पडलेली आहेत. ही मुले बुडाली असल्याची भीती आहे. त्यांचा शोध घेण्यात  येत आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते.