Breaking News

इक्बाल कासकरबरोबर दाऊद इब्राहिमविरोधातही गुन्हा दाखल

ठाणे, दि. 05, ऑक्टोबर - इक्बाल कासकर याच्यासहित दाऊद इब्राहिम याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली  असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर, इक्बाल कासकर याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका व्यावसायिकाकडून 3 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा इक्बाल कासकरवर मंगळवारी दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दाऊद इब्राहिम  हाही सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.