Breaking News

मुंबई महानगरपालिका पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - मुंबईतील प्रभाग क्र. 116मध्ये (भांडुप पश्‍चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी  शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.
काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.  जागृती पाटील या  प्रमिला पाटील यांच्या सून आहेत.  मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून लढता भाजपचा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेनं बराच जोर लावला होता. पण अखेर भाजपनं मोठ्या मता धिक्यानं इथं बाजी मारली. पहिल्या फेरीपासूनच जागृती पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. हिच आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि मोठ्या फरकानं विजय मिळवला.