0
बीड, दि. 05, ऑक्टोबर - आज बुधावरी सकाळी बसने दिलेल्या धडकेतमूळे दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. आंबेजोगईतील  यशवंतराव चव्हाण चौकाजवळ बसचा रॉड तुटल्याने हा अपघात झाला.सदर बस ही परभणीकडून उस्मानाबादकडे निघाली होती तर दोघे युवक स्कुटीवर होते बसने  त्यांना मागुन धक्का दिल्याने हा अपघात घडला. विनोद लक्ष्मण वाघमारे व सुयश तात्याराव मेंढके अशी दोघांची नावे असुन सुयशला उपचारासाठी लातूरला  हलविण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top