0
ठाणे, दि. 13, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विजय कांबळे यांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणा-या भोंदूबाबाला कामोठे पोलिसांनी अटक केली. उदयसिंग प्रतापराव  चव्हाण उर्फ महाराज असे या भोंदूबाबाचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
केंद्रात तसेच राज्यातील महामंडळावर वर्णी लावून देण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने कांबळे यांच्याकडून 1 कोटी 70 घेतले होते. पैसे देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला.  आपली फसवणूक झाल्याचे कळताच कांबळे यांनी या भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली होती. 

Post a Comment

 
Top