0
बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - स्थानिक बसस्थानक परिसरामध्ये महिला व पुरुषा करिता प्रसाधनगृहे आहे. परंतु साफसफाई होत नसून  याकडे संबंधितांचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असून महिला प्रसाधनगृहाच्या मध्ये घाण वास येणे साफसफाई नसने इतकी बिकट अवस्था  आहे. तसेच नाली नसुन पाठिमागे घाण पाणी जाग्यावर साचत असून त्यामुळे दुर्गंधी येत आहे. त्यामुळे संपूर्ण आजुबाजुच्या नागरिकांना  श्‍वास घेणे किंवा त्या ठिकाणी थांबने कठीण झाले असुन प्रवाशी ही हैराण आहेत. 
येथे प्रवाशांना प्रसाधनगृहामध्ये जात असताना अक्षरश: तोंडाला रूमाल बांधून जावे लागते. या प्रसाधनगृहाच्या बाजुला उभे राहणे ही मुश्क ील झाले आहे. या प्रसाधनगृहामध्ये जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याकडे संबंधित ठेकेदार लक्ष देतील का आणि ते क रतील तरी काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या प्रसाधनगृहामध्ये पुर्वी पाण्याची व्यवस्था होती पण आता पहिल्यासारखी होत नाही  त्यामुळे पुरुष व महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन दोन्ही प्रसाधनग ृहाची नियमितपणे साफसफाई करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी त्रस्त झालेल्या प्रवाशांची केली आहे. 

Post a Comment

 
Top