Breaking News

शिवसेनेकडून औरंगाबाद महापौरपदासाठी नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी

औरंगाबाद, दि. 08, ऑक्टोबर - भाजप सेना युतीतील करारानुसार यंदा शिवसेनेला मिळणार्‍या महापौरपदासाठी नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी देण्यात आली  आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी महापौरपद भूषविले आहे. काल शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाचे अधिकृत  उमेदवार म्हणून नंदकुमार घोडेले यांची यांच्या नावाशी घोषणा केली. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे,  संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हे उपस्थित होते.