Breaking News

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात स्फोटकांची बेवारस बॅग सापडली

नाशिक, दि. 03, ऑक्टोबर - इंदिरानगर परिसरातील पाथर्डी गाव मार्गे मुंढेगावाच्या रस्त्यावर पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना गस्त घालणार्‍या पथकास  एक बेवारस बॅग सापडली. रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला .ही बॅग तपासून पाहिले असता यामध्ये साठ जिलेटिन कांडया व 17 डेटोनेटर सापडले आहेत.या  प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गावानजिक एखाद्या विहिरीच्या खोदकामासाठी ही स्फोटके नेण्यात येत असल्याचा प्राथमिक  अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.