Breaking News

फटाकेबंदी करणार नाही : पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे,  बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असं पर्यावरण  मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असं बोललोच नाही, असं रामदास कदम यांनी सां गितलं.आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही.  त्यामुळे फटाके बंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, असंही रामदास कदम म्हणाले. फटाकेबंदी करणार नाही, पण पण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी  यासाठी जनजागृती मी करणार, असंही त्यांनी नमूद केलं.