Breaking News

अधिका-यांना काळे फासण्याचा खा.दिलीप गांधींचा इशारा

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - नगर शहरातून जात असलेल्या महामार्गांचे विस्तारीकरण करण्यासाठी संबंधित रस्त्यांवरील अतिक्रमणे  हटविण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी आवश्यक ती कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत भाजपचे खा.दिलीप गांधी यांनी येत्या  सोमवारी(16 ऑक्टोबर) धरणे आंदोलन करीत अधिका-यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. खा.गांधी यांनी थेट अधिक ा-यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिल्याने अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान शहरातील रेल्वे स्टेशन  रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे 14 ऑक्टोबर रोजी होणारे भूमिपुजन लांबणीवर पडले असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
अहमदनगर शहरातून पुणे,औरंगाबाद,मनमाड,पाथर्डी,दौड,जामखेड,सोलापूर व कल्याण हे महामार्ग जातात.या सर्व महामार्गांचे आता राष्ट्रीय  महामार्गात रूपांतर होत असून या सर्व रस्त्यांचे विस्तारीकरण देखील केले जाणार आहे.मात्र बहुतेक सर्व रस्ते अतिक्रमणांनी व्यापले  आहेत.ही सर्व अतिक्रमणे तातडीने काढून रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू करावे,अशी मागणी खा.दिलीप गांधी यांनी केली आहे.त्यासाठी  खा.गांधी यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिका-यांना मदत करावी अशी मागणी केली  होती.मात्र अधिकारी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याऐवजी अतिक्रमणांना प्रोत्साहन देऊन शहर बकाल करण्यास मदत करीत असल्याचा  आरोप खा.गांधी यांनी केला आहे.सरकारी अधिकारी व बांधकाम व्यवसायिक यांचे लागेबांधे असल्याचा आरोप करीत खा.गांधी यांनी अ धिकारी निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे.तीनही विभागाच्या अधिका-यांना स्वतंत्र पत्र पाठवून खा.गांधी यांनी 16 ऑक्टोबर रोजी धरणे  आंदोलन करून अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान नगर मधील बहुचर्चित व नागरिकांना बर्याच क ालावधीपासून प्रतिक्षा असलेल्या रेल्वे स्टेशन रस्त्यावरील उडडाणपुलाचे 14 ऑक्टोबर रोजी होणारे भुमिपूजन लांबणीवर पडल्याची चर्चा  आहे.मागील महिन्यात मुंबईत वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर खा.दिलीप गांधी यांनीच 14 ऑक्टोबर रोजी केंद्रिय  रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उड्डाणपूलाचे भुमिपूजन होणार असल्याचे  जाहीर केले होते.मात्र अद्याप तरी सरकारी पातळीवर या कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसत आहे.