Breaking News

पुण्यात भाजपाच्या हिमाली कांबळेंचा विजय

पुणे, दि. 12, ऑक्टोबर - पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी राष्ट ्रवादीच्या धनंजय गायक वाड यांच्यावर 4 हजार 583 मतांनी मात केली.
हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली. हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी विजय  मिळवला. दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. या प्रभाग क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीसाठी काल (बुधवार)  मतदान झालं.  या निवडणुकीत केवळ 20.78% मतदान झाल्याने हिमाली कांबळे, की राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड विजयी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.