Breaking News

सोहळा मराठी चित्रपटाचा रत्नागिरीत शुभारंभ

रत्नागिरी, दि. 13, ऑक्टोबर - रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक सुरेशशेठ गुंदेचा यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले असून त्यांची निर्मिती असलेल्या सोहळा या  चित्रपटाचा सचिन पिळगावकर यांच्यासह दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीत झाला. बॉलिवूडचे प्रसिद्ध के. सी. बोकाडिया यांचेही या चित्रपटात महत्त्वाचे योगदान असेल.
रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक सुरेश गुंदेचा यांनी बांधकाम क्षेत्रात यशाचे शिखर गाठल्यानंतर त्यांनी नव्या क्षेत्रात दमदार प्रवेश केला आङे. प्रथमच ते चित्रपट क्षेत्राकडे वळले  असून एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते निर्मिती क्षेत्रामध्ये वळले आहेत. त्यांच्या ‘सोहळा’ या चित्रपटाची कथा सामाजिक प्रश्‍नाला धरून आहे. बदलत जाणारी कुटुंबव्यवस्था आ णि त्यातून निर्माण होणारे तणाव हा चित्रपटाचा विषय आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी समस्यांची मांडणी ‘सोहळा’ या चित्रपटातून केली जाणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण  संपूर्ण रत्नागिरी शहरात होणार आहे. दोन महिन्यांत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. शुभारंभाला उद्योजक आर. डी. तथा अण्णा सामंत, शिल्पा तुळसकर, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे  आदी उपस्थित होते. चित्रपटात विक्रम गोखले, मोहन जोशी, संदीप खरे आणि भारत गणेशपुरे यांच्या भूमिका असतील. ‘सोहळा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन गजेंद्र अहिरे क रणार असून त्यांनीच चित्रपटाला गीते दिली आहेत, तर नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. रघुनंदन पणशीकर यांचा आवाज या चित्रपटाच्या माध्यमातून गायक म्हणून रसिक प्रेक्षकांना ऐक ता येणार आहे.