0
औरंगाबाद, दि, 12, ऑक्टोबर - मुख्यमंत्रद्र फडणवीस यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष  राहुल गांधी यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना मुंदडा यांनी आयटी सेलमध्ये तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.  ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर अत्यंत हीन पातळीवर टीका करणारी पोस्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाच्याच अकाउंटवर हा प्रक ार घडल्याने याचे गांभीर्य वाढल्याचे अर्चना मुंदडा यांनी म्हटले आहे. असे प्रकार परत घडू नये यासाठी या अकाउंट होल्डरचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली  आहे. यासंबंधी त्यांनी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रामेश्‍वर थोरात यांच्याकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top