0
पुणे, दि. 06, ऑक्टोबर - बडोदा येथे पुढील वर्षी भरत असलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येथील  ज्येष्ठ अनुवादक आणि लेखक रवींद्र गुर्जर यांनी आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेत सादर केला. त्यांचा अर्ज मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी  यांनी स्वीकारला. गुर्जर यांच्या अर्जावर सूचक म्हणून्रा. क्षितिज पाटुकले यांची तर अनुमोदक म्हणून डॉ. सु. रा. चुनेकर, जयराम देसाई, रविमुकुल, निरंजन घाटे  आणि अनिल कुलकर्णी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.संमेलनाच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एक अनुवादक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा रहात आहे.  लवकरच आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात करणार असून सर्व मतदारांसमोर आपली भूमिका मांडणार आहोत, अशी घोषणा गुर्जर यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top