Breaking News

दिवाळीसाठी एसटीच्या ज्यादा बसेस

औरंगाबाद, १० ऑक्टोबर - आगार क्र.2 मधून पुणे, अकोला, नागपूर, मेहकर, वाशीम या मार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुख स्वप्नील धनाड यांनी दिली. ज्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त असते अशा मार्गावरच जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी आहे त्या बसचे वेळेत बदल करून अधिकच्या बसेस सोडण्याकरिता तरतुद केली जाणार आहे. औरंगाबादेतून पुण्याला जाणा-या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्वाधिक लक्ष पुणे शहराकडे देण्यात येत आहे.