0
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - शहरात आज दोन तरुणांनी वेगवेगळया कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  घडली. कृष्णा सोमनाथ भारती (31) व किशोर आकाश गिरधारी (30) अशी या तरूणांची नावे आहेत. कृष्णा हा कलरचे काम करतो.  सायंकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर त्याचे व घरातील सदस्यांचे जोरदार भांडण झाले. कृष्णा दारूच्या नशेत असल्याने कुटुंबिय पाहुण्याकडे रात्री झोपण्यासाठी  गेले होते. त्याची पत्नी दररोजच्या होणार्या वादाला कटांळून 15 दिवसापूर्वीच मुलांना येथेच सोडून माहेरी निघून गेली. घरात एकटे असताना  फायदा घेत त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
दुसर्‍या घटनेत किशोर हा तरूण सेन्ट्रीगचे काम करतो. सायंकाळच्या सुमारास घरी आल्या नंतर न जेवताच मी अर्ध्या तासात बाहेरून  येतो म्हणून घराबाहेर गेला. रात्री तो घरी परतला नाही. त्याने गारखेडा परिसरतील विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या  जागेत झाडाला दोरीच्या  सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब पहाटेच्या सुमारास उघड झाली. 

Post a Comment

 
Top